कोस्टल रोडवर भीषण अपघात

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोस्टल रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. कोस्टल रोडवर सुसाट वाहनांवर आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या अपघातात वाहनांचे मोठे … Read more

1995 सालीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार होते… गणेश नाईक यांचे जुन्या आठवणीला उजाळा

नवी मुंबईचे माजी आमदार गणेश नाईक यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि धीरूभाई अंबानी यांच्याबदद्लचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच राजकीय रहस्ये उघड केली आहे. “धीरूभाई अंबानी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे हे चांगले मित्र होते. ते सी विंड – कफ परेड येथे धीरूभाई … Read more

सोने ७ हजारांनी खाली घसरले : गुंतवणुक करण्याची ही योग्य वेळ?

काही दिवसांपूर्वी भारतात सोन्याचा भाव एक लाखाच्या पुढे गेला होता. आता मात्र सोन्याचा भाव सातत्याने घसरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसतेय. आजदेखील सोन्याचा भाव घसरला आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,510 रुपये प्रति दहा ग्रॅम रुपये आहे. तुलनाच करायची … Read more

चोराच्या उलट्या बोंबा…पाकिस्तानने भारतावर केला आरोप

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान हाच दहशतवाद्यांना रसद पुरवत असल्याचे जागतिक मंचावर उघड झाले. पाकिस्तानची जगात नाचक्की होत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानने आता नवीन कांगावा सुरू केला आहे. भारतच पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्ताने सुरू केला आहे. अर्थात त्यांच्या या कोल्हेकुईचा जागतिक मंचावर काहीच … Read more

समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत, डॉक्टर दांपत्यांची गाडी अडवून 11 लाखांचा ऐवज लुटला

मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनधाराकांची संख्या वाढत आहे. परंतु या महामार्गावर लूटमारीच्या घटनाही वाढत आहेत. छत्रपती संभाजीनगरजवळ करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून दोन किलोमीटर दूर अंतरावर गाडी अडवून डॉक्टर दांपत्यास लुटण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याकडून 11 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. सध्या … Read more