Home » Today In Focus » संजय राऊत डोनाल्ड ट्रम्पवर कडाडले

संजय राऊत डोनाल्ड ट्रम्पवर कडाडले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झाली असून आगामी काळातलं युद्ध टळलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. आता यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. यात डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? आमची माणसे मेली आहेत, आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकाराने मध्यस्थी करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली, असं सांगण्यात येतंय हे चुकीचं आहे. तुम्ही जर व्हाईट हाऊसचे निवेदन पाहिलं किंवा ट्रम्प यांचं ट्वीटर अकाऊंट पाहाल तर ट्रम्प यांच्या विनंतीवरुन भारताने युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय, आमची माणसे मेली आहेत, आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकाराने मध्यस्थी करत आहेत, असा सवाल संजय राऊतांनी केला.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?