‘सनम तेरी कसम’च्या इंदरची पुन्हा सरू सोबत काम न करण्याची शपथ

भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष वाढत असताना अभिनेता हर्षवर्धन राणेनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये जर पहिल्याच भागातील कलाकार घेतले तर काम करणार नसल्याचं त्याने जाहीर केलंय. 2016 मध्ये हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आजही … Read more

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांनी तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी १९,२४४ कोटींचा ऐतिहासिक करार

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी आज तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. सुमारे 19,244 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज भोपाळ येथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची … Read more

संजय राऊत डोनाल्ड ट्रम्पवर कडाडले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झाली असून आगामी काळातलं युद्ध टळलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. आता यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका … Read more

युद्धविराम केल्यानंतर डोनाल ट्रम्प यांचा काय मनसुबा?

भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आला. पाकने भारताला कारवाई थांबवण्यासाठी संपर्क साधला तर दुसरीकडे अमेरिकच्या हातपाया पडला. त्यानंतर दोन्ही देशांनी काल संध्याकाळी 5 वाजता सीजफायर, युद्धविरामाची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाची घोषणा करतानाच काश्मीर प्रश्नावर महत्त्वाचे भाष्य केले. त्यामुळे काश्मीर प्रश्नात ट्रम्प यांनी उडी घेतली का? त्यावर … Read more

शस्त्रसंधीनंतरही नरेंद्र मोदींकडून बैठकांचे सत्र चालूच

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. शस्त्रसंधीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन महत्वाच्या बैठका झाल्या. पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्याचे प्रमुख देखील उपस्थित होते. तसेच रॉ आणि … Read more