जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर जगातला कोणता देश कुणाच्या बाजूनं असेल याची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा जुना मित्र असलेला रशिया भारताच्या बाजूनं धावून आलाय. तर चीनने आपला खरा रंग दाखवत पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत असल्याची ग्वाही, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे.

व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून बातचीत केली आणि पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यातल्या दोषींना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा मिळायलाच हवी, यावर पुतीन यांनी जोर दिला. तर दुसरीकडे भारत- पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीननं मोठं विधान केलंय. स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ, असं चीननं जाहीर केलंय. पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी इस्लामाबादमध्ये चीनच्या राजदूतांची भेट घेतली. त्यावेळी चीनंन ही ग्वाही दिली. तसेच जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. तर तुर्कस्थानने पाकिस्तानला पाठिंबा दिला.
भारताच्या बाजूने कोण?
1. रशिया
2. जपान
पाकिस्तानच्या बाजूने कोण?
1. चीन
2. तुर्कस्थान
तर इराणचा भारत आणि पाकिस्तानला शांतता राखण्याचा सल्ला. इराणनेही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेतून तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी केलंय. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची हे पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी हे आवाहन केलं. गुरूवारी (8 मे) अराघची हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. तिथे ते भारतीय नेतृत्वाशीही शांततेबाबत चर्चा करतील.




Users Today : 39