पुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. सीमेवर फक्त प्रतिक्रिया देणे पुरेसे नाही, तर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग असून बहुसंख्य काश्मीरी भारतीय असल्याचा त्यांनी दावा केला.

ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर हेही पहलगाम हल्ल्यानंतर भयानक संतापले असून बॉर्डरवर फक्त फुलझड्या लावू नका , कडक ॲक्शन घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. लक्षात राहील असं उत्तर द्या, असंही ते म्हणाले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. आरपार करून पाकिस्तानला अद्दल घडवा,अशी थेट मागणी त्यांनी केली.
पाकिस्तानचा प्रपोगंडा, पाकिस्तानची एस्टॅब्लिशमेंट,पाकिस्तानचा मुल्ला, पाकिस्तानचं सैन्य काश्मीरबद्दल काय म्हणतात – हे सगळे काश्मीरी आहेत ते मनापासून पाकिस्तानी आहेत. भारताने त्यांच्यावर कब्जा केलाय. पण हे खोटं आहे. काश्मीरी हे भारतीय आहेत, काही पागल आहेत, पण त्यांना सोडून द्या, असे सगळीकडेच असतात. 95 ते 99 % काश्मीर हे भारताशी प्रामाणिक आहेत. मी दिल्लीतील सरकारला विनंती करतो की हे ( दहशवादी कृत्य) खूप वेळा झाली आहेत, एकदा नाही, गेल्या 75 वर्षांत दर 2-3 वर्षांनी हे (हल्ले) होतच असतात, असा गोंधळ माजवत असतात,असं जावेद अख्तर म्हणाले.



