मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री छाया कदम सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे अडचणीत सापडली आहे. छाया यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरून वनस्पती आणि प्राणी कल्याण संस्थेनं ठाण्यातील वन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. “मी रानडुक्कर, ससा, घोरपड साळिंदर अशा प्राण्यांचं मांस खाल्लंय”, असं छायाने या मुलाखतीत म्हटलं होतं. यातील अनेक प्राणी हे संरक्षित वन्यजीवच्या यादीत येतात. त्यामुळे वन विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संबंधित संस्थेनं तक्रार केली आहे. इतकंच नव्हे तर याप्रकरणी छायावर आणि वन्य प्राण्यांची शिकार करण्यात किंवा खाण्यात सहभागी असलेल्या इतरांवर कायदेशीर कारवाई करण्यास त्यांनी सांगितलं आहे.





Users Today : 38