Home » Today In Focus » मुंबईतील मुंब्राच्या बिल्डींग व्हेंटिलेशन डक्ट मध्ये सापडला अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह

मुंबईतील मुंब्राच्या बिल्डींग व्हेंटिलेशन डक्ट मध्ये सापडला अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न  मृतदेह

मुंब्रा येथील एका 10 मजली रहिवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये एका अल्पवयीन मुलीचा अर्धन्गन मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुंब्रा येथील सम्राट नगर भागातील श्रद्धा इमारतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती सोमवारी रात्री 11.48 च्या सुमारा ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. मात्र ही मृत मुलगी या इमारतीची रहिवासी नव्हती, मग ती त्या इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये कशी पडली असावी असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात असून ती ज्या परिस्थितीत सापडली, त्यामुळे अनेक शंका व्यक्त होत आहेत. ही अल्पवयीन मुलगी नेमकी त्या परिसरात कशी सापडली. ती तेथे का गेली होती या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह

ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तर मुलीचा मृतदेह सापडल्याचे वृत्त समजताच आजूबाजूच्या लोकांची गर्दीही घटनास्थळी जमू लागली. हा अपघात होता की कोणीतरी ही घटना घडवून आणली? हे अद्याप काहीही कळू शकले नाही. याशिवाय, त्या मुलीवर काही अत्याचार झाला आहे की नाही याचाही पोलिस शोध घेत आहेत. मृत मुलगी ही ठाकूर पाडा परिसरातील रहिवासी होती, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?