भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधवचा अखेर भाजपात प्रवेश

माजी भारतीय क्रिकेटर केदार जाधवने क्रिकेटनंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. केदार जाधवने भाजप पक्षात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी केदार जाधवला भाजपाचं सदस्यत्व दिलं. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याने मला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे काम करायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली … Read more

सर्व नाराज राज्यमंत्री एकत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यानंतर मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार समोर आला आहे. महायुतीमधील मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. राज्यातील राज्यमंत्री प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्याला कारण कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप केले नाही. त्यामुळेच आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आरोग्य सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात अनुपस्थित … Read more

नेतन्याहू यांच्या लिबिया मॉडेलच मागणी मागील कारण काय?

अमेरिका आणि इराण यांच्यात अप्रत्यक्ष उच्चस्तरीय अणुचर्चा सुरू होत आहे. दोन्ही देशांचे अधिकारी शनिवारी, 12 एप्रिल रोजी ओमानमध्ये भेटून चर्चा करणार आहेत. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी मंगळवारी ही माहिती दिली. इराण आणि अमेरिका शनिवारी ओमानमध्ये अप्रत्यक्ष उच्चस्तरीय चर्चेसाठी भेटणार आहेत, असे अराघची यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ही एक संधी आहे आणि परीक्षाही आहे. चेंडू … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात ऊभे ठाकले 27 देश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ज्या प्रकारे टॅरिफ वॉर सुरू केले आहे, त्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. पण जगात असे काही देश आहेत ज्यांनी ट्रम्प यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. चीनने यापूर्वीच अमेरिकेला या प्रकरणात आरसा दाखवला असून आता 27 देशांचा संपूर्ण गट म्हणजेच युरोपियन कमिशनही ट्रम्प यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. 16 मेपासून … Read more

मुंबईतील मुंब्राच्या बिल्डींग व्हेंटिलेशन डक्ट मध्ये सापडला अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न  मृतदेह

मुंब्रा येथील एका 10 मजली रहिवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये एका अल्पवयीन मुलीचा अर्धन्गन मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुंब्रा येथील सम्राट नगर भागातील श्रद्धा इमारतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती सोमवारी रात्री 11.48 च्या सुमारा ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. मात्र ही मृत मुलगी या … Read more

मनसेचे मुंबई मेट्रोला अल्टिमेटम

सध्या मुंबईत मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार सुरु आहे. मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 2 अ टप्पा लवकरच सुरु होणार आहे. मुंबई मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा सुरु होण्याआगोदरचं मुंबईतील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर आली आहेत. त्यामागे कारण आहे. नुकतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकांचा कारभार मराठी भाषेतून व्हावा, यासाठी सुरु केलेलं आंदोलन स्थगित … Read more

मुंबईतील पहिला ‘फॉरेस्ट वॉकवे’ अखेर सुरू

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात निसर्गाचा श्वास घेता येईल अशी जागा सापडणं दुरापास्त मानलं जातं. मात्र, आता मुंबईकरांसाठी अशीच एक खास जागा खुली करण्यात आली आहे. या ठिकाणाचे नाव आहे एलिवेटेड नेचर ट्रेल, जी मुंबईच्या मलबार हिलवर बांधण्यात आलेली पहिली ट्रेल आहे. शांत आणि हिरव्यागार परिसरात सुमारे ४८५ मीटर लांबीचा हा वॉकवे कमला नेहरू पार्कपासून डोंगरवाडीच्या जंगलांपर्यंत … Read more

महागाई वरून संजय राऊतांचा सरकारवर हल्ला

एका  बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली येत असतील तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला पाहिजे. तो जर मिळत नसेल तर भारतासारख्या देशात निर्मला सीतारमण या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचं काम करत आहेत. सिलेंडरच्या किंमतीत आणखी 50 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं बजेट परत कोलमडलं. स्मृती इराणी, कंगना राणावत, भाजपच्या महिला नेत्या आहेत, … Read more

पुढील तीन दिवसांत राज्याला उन्हाचा जोरदार तडाखा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला … Read more