Home » Today In Focus » मनसेचे मुंबई मेट्रोला अल्टिमेटम

मनसेचे मुंबई मेट्रोला अल्टिमेटम

सध्या मुंबईत मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार सुरु आहे. मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 2 अ टप्पा लवकरच सुरु होणार आहे. मुंबई मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा सुरु होण्याआगोदरचं मुंबईतील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर आली आहेत. त्यामागे कारण आहे. नुकतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकांचा कारभार मराठी भाषेतून व्हावा, यासाठी सुरु केलेलं आंदोलन स्थगित केलं. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून आंदोलन थांबवण्याची सूचना केली.

राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलतान मनसैनिकांना बँकांचा कारभार मराठीत सुरु आहे की, नाही? ते पाहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मनसैनिकानी बँकांमध्ये धडकण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी खळळ, खट्याक सुद्धा झालं.

आता मेट्रो 3 च्या टप्यातील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर येण्यामागे मराठी भाषेचा मुद्दा आहे. मेट्रोच्या सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाबाहेरील फलकावर इंग्रजीमध्ये नाव लिहल्याने मनसेकडून इशारा देण्यात आला आहे. “मेट्रोला मराठीचा द्वेष? तात्काळ फलक मराठी करावा, अन्यथा गाठ मनसेशी” असा थेट इशाराच मनसेने दिला आहे.

कसला माज

मेट्रो प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे. दोन दिवसात त्यांनी नाव बदललं नाही, तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मराठीचा विषय सुरु असताना, मेट्रोला कसला माज दोन दिवसात मराठीत नाव केल नाही तर उत्तर देऊ असं मनसेनं म्हटलं आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?