कर्जमाफीच्या मुद्यांवरुन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी कृषीमंत्री कोकाटे पाहणी करत होते. तसेच नुकसानीचा आढावा घेत होते. यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे.
शेतकरी 5 ते 10 वर्ष वाट बघतात तोपर्यंत कर्ज भरतचं नाहीत. सरकार शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचे कोकाटे म्हणाले. भांडवली गुंतवणूक सरकार करत आहे. शेतकरी करतो का? असा सवाल कोकाटे यांनी केला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज सायंकाळी उशिरा अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला. दिवसभर नाशिक शहरात असूनही अवकाळी भागाचा दौरा करणयासाठी कृषीमंत्र्यांना उशीर झाला आहे. पक्षाची बैठक आणि इतर बैठकींना उपस्थिती लावल्याने कृषिमंत्र्यांना दौरा करण्यास उशीर झाला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळं राज्यातील विविध भागात शेती पिकांना फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.





Users Today : 14