उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन हे मुलुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅडवोकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ग्रंथांच्या प्रदर्शना सोबत त्यांची विक्री देखील केली जाणार आहे यासोबतच एका ग्रंथ दिंडीचे आयोजन देखील या निमित्ताने केलं जाणार आहे. 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वाचन प्रेमींना घेता येईल. ए आय टेक्नॉलॉजी चा वापर करत ग्रंथालय ही सुसज्ज करण्याचा आवाहन यावेळी पालकमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केलं




Users Today : 22