पाथरी मध्ये आमदार कोण या पक्षाचा आहे हे न पाहता आम्ही विकास कामे करू .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे पाथरीचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे .उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना कधी घ्यायचे हे आम्ही ठरवणार आहेत .संजय राऊतांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे 2024 ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यामुळे भूतो न भविष्यात आम्हाला मिळाले .एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी फोडली जाईल असे विधान संजय राऊत यांनी केले मात्र रात्रीची त्यांची उतरली नसल्यामुळे त्यांनी तसे विधान केले असेल संजय राऊत काय बोलतात आम्ही त्याला महत्व देत नाही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. उद्या आमची कॅबिनेट आहे त्यामध्ये यावर चर्चा होणार आहे आमच्या पक्षांमध्ये कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील ते आम्हाला कोणी सांगू नये.




Users Today : 27