मुंबई मनपाची पवई येथील मराठी शाळा दुर्गा देवी मनपा मराठी शाळा अचानक बंद करण्याची नोटीस आल्याने पालकांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला आहे. या शाळेत २६० विद्यार्थी बालवाडी ते आठवी शिक्षण घेत आहे. मात्र इथे रस्त्याचे काम सुरू असताना एका वर्गाच्या भिंतीला जेसीबी चा धक्का लागला आणि भिंतीचा काही भाग खचला. बैठ्या स्थिती मध्ये असलेल्या या शाळेचा एक वर्ग बंद करण्याऐवजी ही संपूर्ण शाळा धोकादायक झाली असल्याचा ठपका ठेवत ही शाळा बंद करून दोन किमी लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. ही शाळा चांदिवली च्या मध्यावर मोक्याच्या ठिकाणी असल्याने हे आजूबाजूच्या विकासकांचे षडयंत्र असल्याचा संशय आहे. मात्र बाजूच्या झोपडपट्ट्या मध्ये घरकाम करणाऱ्या लोकांची ही मुले असल्याने इतक्या दूर ते शिकायला पाठवणार नाही आणि मुल शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती आहे. या मुळे ही शाळा इथेच सुरू राहावी म्हणून आज या शाळेसमोर पालक आणि विद्यार्थी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत निदर्शने केली ही मराठी पालिकेची शाळा वाचविण्याची विनंती केली जात आहे.




Users Today : 1