Home » व्यवसाय » काश्मीरचे अंबानी मुश्ताक अहमद चाया

काश्मीरचे अंबानी मुश्ताक अहमद चाया

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रात आपला उद्योगाचा विस्तार केला. त्यांच्याप्रमाणे उद्योगाचा विस्तार आपल्या भागांत करणारे काही जण आहेत. काश्मीरमध्ये जेव्हा अस्थिरता आणि दहशतवाद होता, त्या काळात एका व्यक्तीने आपला संकल्प आणि दूरदृष्टीकोनातून उद्योग उभा केला. त्यामुळे हजारो जणांना रोजगार मिळाला. त्यामुळे त्यांना काश्मीरचे अंबानी म्हटले जाते. काश्मीरचे अंबानी असणारे हे व्यक्ती म्हणजे मुश्ताक अहमद चाया आहेत.

मुश्ताक अहमद चाया यांचा जन्म एका सामान्य परिवारात झाला. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात 1984 मध्ये गुलमर्गमधील एका लहान हॉटेलपासून सुरु केली. पर्यटन व्यवसायात त्यांनी ठेवलेले पाऊल चांगलेच यशस्वी झालेले पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे आता जम्मू काश्मीर आणि दिल्लीत मिळून 14 हॉटेल्स आणि 450 खोल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटकांना हॉटेलमधील खोल्या भाड्याने देऊन अब्जावधी रुपयांची कमाई केली आहे. त्यांचा मुश्ताक हॉटेल समूह कश्मीर, जम्मू आणि दिल्लीत सर्वत्र पसरलेला आहे. त्यांची Radisson, LTH आणि Bloom या प्रतिष्ठित ब्रँड्सोबत पार्टनरशिप आहे.

मुश्ताक चाया यांनी ग्रँड मुमताज हॉटेल्सची स्थापना केली. त्यांच्या समूहाच्या काश्मीर, जम्मू आणि दिल्लीत 14 हॉटेल आहेत. त्यात सहा हॉटेल प्रतिष्ठित रेडिसन ब्रँडच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत. त्या हॉटेलमध्ये श्रीनगरमधील रेडिसन कलेक्शन हॉटेल अँड स्पा रिव्हरफ्रंट आहे. यामध्ये 212 खोल्या आहेत. मुश्ताक चाया एक यशस्वी उद्योजक नाही तर ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रसेर असतात. ते जम्मू आणि कश्मीर हॉटलियर्स क्लबचे अध्यक्ष आहेत. पीएचडी चँबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे ते अध्यक्ष राहिले आहेत.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?