नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला आहे. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात तणाव होत. तसेच, आजची सकाळही तणावपूर्ण शांतता घेऊनच उजाडली आहे. सध्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून मोठा पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला. औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली. त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात काही पोलीस जखमी झाले. या हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.
काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात तणाव असून आजची सकाळही तणावपूर्ण शांतता घेऊनच उजाडली आहे. ज्या परिसरामध्ये ही दगडफेक झाली होती, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तीन झोनच्या जवळपास 7 ते 8 पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पाचपेक्ष जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, अशा सूचना पोलिसांक़ून देण्यात आल्या आहेत. सकाळपासूनच पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे. रात्री 12 पासूनच ही संचारबंदी लागू करण्यात आली असून अनेक नागरिकांना याची कल्पना नसल्याने सकाळपासून शहरात अनेक ठिकाणी पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या परिसरात संचारबंदी आहे, कोणीही घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन पोलिसांतर्फे नागरिकांना केलं जात आहे.




Users Today : 39