Home » राज्य » अंबरनाथमध्ये युवासेनेचा ‘युवा रंग महोत्सव’, डीजेच्या तालावर तरुणाईचा मोठा जल्लोष

अरविंद वाळेकर, राजू वाळेकर, निखिल वाळेकर यांची प्रमुख उपस्थिती

अंबरनाथमध्ये आज युवासेनेचा युवा रंग महोत्सव पार पडला. या महोत्सवात डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरत धुळवड साजरी केली. माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर, युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनीही यावेळी तरुणाईसोबत ठेका धरला.
अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शनमधील अटल उद्यानात हा युवा रंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीजे बिन्नी आणि डीजे सिम यांनी एकापेक्षा एक गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडलं. या कार्यक्रमाला तरुणाईने प्रचंड मोठा प्रतिसाद देत गर्दी केली होती. रेन डान्स, फूड स्टॉल्स यांचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. यावेळी या युवा रंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल निखिल वाळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अंबरनाथमध्ये युवासेनेचा ‘युवा रंग महोत्सव’, डीजेच्या तालावर तरुणाईचा मोठा जल्लोष

अरविंद वाळेकर, राजू वाळेकर, निखिल वाळेकर यांची प्रमुख उपस्थिती

अंबरनाथमध्ये आज युवासेनेचा युवा रंग महोत्सव पार पडला. या महोत्सवात डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरत धुळवड साजरी केली. माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर, युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनीही यावेळी तरुणाईसोबत ठेका धरला.
     अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शनमधील अटल उद्यानात हा युवा रंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीजे बिन्नी आणि डीजे सिम यांनी एकापेक्षा एक गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडलं. या कार्यक्रमाला तरुणाईने प्रचंड मोठा प्रतिसाद देत गर्दी केली होती. रेन डान्स, फूड स्टॉल्स यांचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. यावेळी या युवा रंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल निखिल वाळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?