Home » राज्य » MUMBAI | धनंजय मुंडे वादग्रस्त कृषीमंत्री होते, त्यांनी आणलेल्या योजनांना भ्रष्टाचाराची झालर आहे- विजय वडेट्टीवार

MUMBAI | धनंजय मुंडे वादग्रस्त कृषीमंत्री होते, त्यांनी आणलेल्या योजनांना भ्रष्टाचाराची झालर आहे- विजय वडेट्टीवार

१ रुपये पीक विमा हा बीड पॅटर्न म्हणून सरकारने आपली पाठ थोपटली होती . पण खरीप २०२४ हंगामात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे . या योजने अंतर्गत ४ लाख अर्ज आले त्यातील एक लाख ९ हजार बोगस अर्ज हे बीड मधून होते .आता शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नका, ज्यांनी हे केले पैसे खाल्ले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.कृषिमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, या निर्णयांची समिती नेमून छाननी झाली पाहिजे. मंत्र्यांच्या इशाऱ्याशिवाय हे होणे शक्य नाही, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. याची शिक्षा शेतकऱ्यांना होता कामा नये

Leave a Comment