दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी कोकणातील लाल मातीतही चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. कृषी पदवीधारक विद्यार्थी असलेल्या साहिल पेठे यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने पेठे यांनी स्ट्रॉबेरीचा पर्याय निवडला आहे. त्यांच्या प्रयोगाला यशही आलं आहे.
त्यामुळे स्ट्रॉबेरी शेतीखालील क्षेत्र वाढवण्याचं त्यांनी ठरविलं आहे. कोकणातील लाल मातीत अधिक गुणधर्म असलेली उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते याची खात्री झाल्याने पुढील वर्षापासून त्यांनी अन्य शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचं ठरवलं आहे. या स्ट्रॉबेरीला महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक दर मिळत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होत असल्याचं पेठे यांनी यावेळी सांगितलं.




Users Today : 2