Home » राजकारण » गुलाबराव पाटील संजय राऊतांवर कडाडले

गुलाबराव पाटील संजय राऊतांवर कडाडले

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या  ‘नरकातील स्वर्ग’  या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत.  ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असा दावा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे,  बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक वेगळं नातं आहे. बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं, मोदी गया तो गुजरात गया. संजय राऊत त्यावेळेस पत्रकार होते, संपादक होते. त्यांना भाजपमध्ये काय चाललं ते माहीत नव्हतं. मात्र आता हा भाऊ एकटाच तिकडे राहिला आहे, त्यामुळे ते बोलत आहेत.

संजय राऊत त्यावेळी काय मध्यस्थ नव्हते, की त्यांनी त्यावेळी सर्व गोष्टी पाहिल्या. एवढ्या मोठ्या लोकांवर त्या माणसाने बोलनं मला उचित वाटत नाही. मोदी साहेबांच्या मनात बाळासाहेबांबद्दल कायमच आदराचं स्थान आहे. कायम राहणार आहे. आजही कोणी म्हणत असेल, बाळासाहेबांची शिवसेना संपली तर निश्चितच नाही. कारण आम्ही त्यांचे शिवसैनिक आजही जिवंत आहोत, असं यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?