बीड मसाजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यभरातून यावर संतापाची लाट उसळली. तपासादरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड आणि त्यांची टोळी या घटनेसाठी जबाबदार असल्याचे समोर आले. या सगळ्या गुंडाना गजाआड केल्या नंतर धनंजय मुंडे हे या टोळीचे आका असल्याचे म्हटले गेले. मग, विरोधी पक्षातील नेत्यांपासून ते सामान्य जनमानसांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आणि धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. यावेळी त्यांनी X (ट्विटर) या समाज माध्यमावर आपली प्रकृती बरी नसल्या कारणाने राजीनामा देत असल्याचं म्हटलं पण, त्यानंतर खुद्द अजित पवार यांनी त्या राजीनाम्यात कुठेही आजारपण किंवा प्रकृतीबद्दल काहीच नमूद नसल्याचे सांगितले.

आता बातम्या येऊ लागल्या आहेत की, धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारे गेले त्यामुळे त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले असून आता त्यांची परिस्थिती काहीशी स्थिर आहे. परंतु आता प्रश्न उठू लागलाय तो हा की, जर धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी झाली तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल का? हा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले अजित दादा
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याची मागणी होतेय, त्यावर सुद्धा अजित पवार बोलले आहेत. “कोणी काय म्हणाव, उद्या इथे तुम्हाला मंत्री करा असं म्हणतील. मधल्या काळात जी घटना घडली, त्याची सीआयडी चौकशी सुरु आहे. पोलीस तपास सुरु आहे. एसआयटी नेमलेली आहे. या सगळ्याचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील” असं अजित पवार म्हणाले




Users Today : 24