
सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसला वरून वाद पेटला आहे. खंडणी प्रकरणी खोक्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्याला राजकीय नेत्यांचा असलेला पाठिंबा उघड पडत आहे. त्यामुळे यावर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त करत सरकारवर सडकून टीकाही केली आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
विधीमंडळात खोकेभाई भरले असं राज ठाकरे म्हणाले. त्यांचं विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवलं आहे. असे खोके भाई राजकारणात असल्याने ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही. भूमिका नाही. नैतिकता नाही. ते सर्व खोके भाई एकत्र झाले आणि त्यांनी सरकार बनवलं” असं संजय राऊत म्हणाले.



