Home » मनोरंजन » कुणाल कामराच्या सेट ची तोडफोड केल्या प्रकरणी शिवसैनिकांना अटक

कुणाल कामराच्या सेट ची तोडफोड केल्या प्रकरणी शिवसैनिकांना अटक

एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कुणाल कामराने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आहेत. काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली आणि नासधूसही केली.

एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्याद्वारे वादग्रस्त टिपण्णी करणारा कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्याने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली, नासधूसही केली. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या तोडफोडीप्रकरणी खार पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली आहे. द हॅबिटॅट स्टुडिओची 60 ते 70 लोकांन तोडफोड केली होती. त्याचप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या 11 आरोपीना वांद्रे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. राहुल कनाल, कुणाल सरमळकर यांना सीआरपीसी 41 अंतर्गत नोटीस देण्यात आली.

संजय राऊत यांनीही कुणालचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, तो पाहता पाहता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. यामुळे खवळलेल्या शिवसैनिकांनी काल रात्री द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. शिंदेंच्या शिवसैनिकांनी जे हॉटेल फोडलं, त्यात आता पुन्हा स्टँडअप कॉमेडी होणार नाही. रात्रीच शो चे बॅनरही हटवण्यात आले. राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये घुसत स्टुडिओची तोडफोड केली. याप्रकरणी शिंदेच्या शिवसैनिकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. अखेर आज 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?