Home » मनोरंजन » भारतातल्या ६ मिस वर्ल्ड्स माहित आहेत का तुम्हाला?

भारतातल्या ६ मिस वर्ल्ड्स माहित आहेत का तुम्हाला?

मिस वर्ल्ड्स विश्व सुंदरी, सौंदर्य स्पर्धेत मानाचा केंद्रबिंदू असलेली स्पर्धा, जगभरातील हजारो करोडो महिलांचं स्वप्न असलेली स्पर्धा. आपल्या सौंदर्याच्या जोरावर मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या 6 भारतीय कोण आहेत? माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात या विश्वसौंदर्या बद्दल…

मिस वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात 1951 मध्ये लंडनमध्ये झाल होती. तेव्हापासून आजपर्यंत 6 भारतीय मिस वर्ल्ड झाल्या आहेत. रिता फारिया मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या. 17 नोव्हेंबर 1966 रोजी त्यांनी हा किताब जिंकला होता.अभिनेत्री ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी दुसरी भारतीय आहे, तिने 1994 मध्ये हा किताब जिंकला होता.डायना हेडन हिने 1997 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकवून इतिहास रचला होता.याशिवाय 1999 मध्ये युक्ता मुखीने देखील हा किताब आपल्या नावावर केला होता.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करणारी 5 वी भारतीय ठरली होती. त्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांका चोप्रानंतर जवळपास 17 वर्षांनी हरियाणाच्या मनुषी छिल्लरने ही कामगिरी करुन दाखवली. मनुषीने 2017 मध्ये हा किताब जिंकला..अशी कामगिरी करणारी ती सहावी भारतीय ठरली.

मिस वर्ल्ड 2025 या स्पर्धेचं आयोजन तेलंगणामध्ये करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी म्हणजेच मिस वर्ल्ड 2024 च्या स्पर्धेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं.

Leave a Comment