दिल्ली आणि NCR मध्ये शुक्रवारी सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. काही भागात गारपीट झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळांमध्ये मोठा दिलासा मिळाला. घामाच्या धारा थांबल्या. अचानक पावसाने दणका दिल्याने कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांना पावसाने चकवा दिल्याने अनेकांना ओल्या कपड्यानिशी कार्यालय गाठावं लागलं. या अचानक पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची त्रेधात्रिपीट उडाली.

बदललेल्या पावसामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. 40 हून अधिक विमानांची दिशा बदलण्यात आली. तर 100 हून अधिक विमान सेवेला उशीर होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ( IMD) राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्यानुसार पुढील दोन तासांत दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात 70 ते 80 किमी प्रति तास वेगाने वारा वाहणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यातच मुसळधार पाऊस हजेरी लावले अशी देखील शक्यता वर्तवली गेली आहे.
पालक हवामान केंद्राने 74 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा दावा केला आहे. तर काही दिवसांनी उष्णतेमुळे लाही लाही होत असलेल्या दिल्लीकरांना आणि उत्तर भारतामधील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी येण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर या काळात प्रवास टाळण्याच्या सूचना हवामान खात्याने नागरिकांना दिल्या आहेत.




Users Today : 0