Home » गुन्हा » अंबाजोगाईत एका तरुणावर कोयता हल्ला

अंबाजोगाईत एका तरुणावर कोयता हल्ला

अंबाजोगाईतील पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. ही घटना 1 एप्रिल रोजी घडली होती.
यामध्ये करडे याच्या गळ्यावर, डोक्यात,पाठीवर वार करण्यात आले होते यात करडे गंभीर जखमी झाला होता.

जखमी राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी अंबेजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

यातील तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे अंबाजोगाई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment