Home » गुन्हा » माजलगावमध्ये भाजपच्या बूथ विस्तारकाची हत्या

माजलगावमध्ये भाजपच्या बूथ विस्तारकाची हत्या

माजलगाव येथे बाबासाहेब प्रभाकर आगे याच्यावर आरोपी नारायण फपाळ याने बाजार रोड परिसरात धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात बाबासाहेब प्रभाकर आगे याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत हा किट्टी आडगाव येथील रहिवासी असून भाजपचा बूथ विस्तारक म्हणून देखील काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. बाबासाहेब आगे याची हत्या केल्यानंतर आरोपी नारायण फपाळ कोयत्यासह पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला. आरोपीने पोलिसांना हत्येबाबत कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून या घटनेचा तपास माजलगाव पोलीस करत आहेत.

Leave a Comment