Home » गुन्हा » बीडमध्ये नराधम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

बीडमध्ये नराधम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

राज्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा चेहरा उघडा पडला. येथील स्थानिक गुडांच्या वरदहस्ताने अवैध धंदे आणि दहशतीच्या माध्यमातून खंडणींचे होणारे प्रकार समोर आले. अद्यापही येथील गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. त्यातच, आता बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्याकडून आपल्या 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महिलांवरील अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पोलिसांकडून तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला जात असतानाही, अशा घटना वारंवार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यातच, बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतून नात्याला काळिमा फासणारी ही घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या नराधम पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकनूर येथील एका गावात पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली. तर, मुलगी घरी एकटी होती. शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीची आई पुण्यावरून परत आल्यानंतर सदरील प्रकार उघडकीस आला. त्यानंतर, पीडितेच्या आईने याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम पित्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आईच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या नराधाम आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?