एकीकडे राज्यभरात रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी नगरातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या टॉवरवर एक तरुण चढला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी या घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस आणि समुद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि टॉवर वर चढलेल्या तरुणाचे बचाव कार्य या पथकाकडून सुरू करण्यात आले. तब्बल अर्धा पाऊण तास अग्निशामक दल आणि पोलीस पथक यांनी परिश्रम घेऊन त्या तरुणाला खाली उतरवले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रेम प्रकरणातून हा तरुण टॉवर वर चढल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून, यासंदर्भात पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

[democracy id="1"]


