आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने केकेआरला हरवून विजय मिळवला. आता तिसरा सामना दोन बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI VS CSK) यांच्यात होणार आहे, ज्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी, एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल एक मोठे विधान केले आहे.

हा हाय व्होल्टेज सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. धोनीचा हा 18 वा हंगाम आहे आणि तो 16 व्यांदा चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणार आहे. दरवर्षी जसजसे आयपीएल जवळ येते तसतसे माहीच्या निवृत्तीच्या बातम्याही जोर धरू लागतात, ज्यावर आता या क्रिकेटपटूने पूर्णविराम दिला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्याआधी MS धोनीने सांगितला निवृत्तीचा प्लॅन
धोनीने गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते, ज्यामुळे तो 2024 मध्ये स्पर्धेतून निवृत्त होणार अशी अटकळ बांधली जाऊ लागली होती. पण, यावर्षीही धोनी यलो संघाला विजय मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम करताना दिसेल. आता मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी, त्याने आयपीएल २०२५ च्या ब्रॉडकास्टरशी झालेल्या संभाषणात त्याच्या निवृत्तीबद्दलचे मौन अखेर सोडले आहे.
धोनी म्हणाला की, ‘मी जोपर्यंत माझी इच्छा आहे तोपर्यंत मी सीएसकेसाठी खेळू शकतो. ही माझी फ्रँचायझी आहे. मी व्हीलचेअरवर असलो तरी ते मला मैदानात ओढतील. 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीनंतर एमएस धोनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
आयपीएलमध्ये धोनीचा रेकॉर्ड
धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला पाच ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. माजी कर्णधाराने आतापर्यंत 264 आयपीएल सामने खेळले आहेत. धोनीने 39.13 च्या सरासरीने आणि 137.54 च्या स्ट्राईक रेटने एकूण 5243 धावा केल्या आहेत. धोनीने त्याच्या शानदार आयपीएल कारकिर्दीत 24 अर्धशतकेही झळकावली आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद.




Users Today : 26