नांदेड 13फेब्रुवारी :
गोळीबार झाल्याची तक्रार देणारा फिर्यादीच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास पूर्ण करत या बनावाचा पर्दाफाश केला.
फिर्यादीने दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता काही अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर गोळीबार केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच परिसरातील परिस्थितीची पडताळणी केली.
सखोल चौकशीत फिर्यादीनेच स्वतःवर गोळीबाराचा बनाव रचल्याचे उघड झाले. काही व्यक्तींना अडकविण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित आरोपीवर यापूर्वीही चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खोट्या तक्रारींद्वारे पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Home
»
Uncategorized
»
गोळीबाराचा बनाव; फिर्यादीच ठरला आरोपी उपशीर्षक : यापूर्वीही चार गुन्ह्यांची नोंद; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई
गोळीबाराचा बनाव; फिर्यादीच ठरला आरोपी उपशीर्षक : यापूर्वीही चार गुन्ह्यांची नोंद; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

lokmanchmarathi

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?
उमराणी ओढा पात्रातील अतिक्रमण काढा : पँथर सेनेचे धरणे आंदोलन
lokmanchmarathi
नांदेड जिल्ह्यात निवडणूक तापली – मतदारांच्या लांबच लांब रांगा*
lokmanchmarathi
उमराणी ओढा पात्रातील अतिक्रमण काढा : पँथर सेनेचे धरणे आंदोलन
lokmanchmarathi
नांदेड जिल्ह्यात निवडणूक तापली – मतदारांच्या लांबच लांब रांगा*
lokmanchmarathi


Users Today : 24