धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत एकांत स्थळी बोलवत संबंधित व्यक्तीचे आक्षेपार्य फोटो काढून त्याच्याकडून 12 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तपास करत या टोळीच्या मुस्क्या आवळल्या असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे शहरातील एक महिला आणि चार तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाशी मैत्री करत संबंधित व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी बोलवून त्याचे आक्षेपार्य फोटो काढून त्याच्याकडून तब्बल 12 लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित पिडीत व्यक्तीने याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने संबंधित व्यक्तीकडून पैसे घेताना नंदुरबार येथून 4 जणांना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने फसवणूक झाली असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा संबंधित व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे.




Users Today : 25