जिल्हा परिषद केंद्रीय शाळा पाथरगव्हाण (बु.) यथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

आज दिनांक 11 मार्च मंगळवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाथरगव्हाण बुद्रुक येथे कै. गणेश अण्णासाहेब घांडगे प्रतिष्ठान पाथरगव्हाण बुद्रुक व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाथरगव्हाण बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि विज्ञान दिवस यानिमित्त विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनासाठी श्री पवनराव शंकरराव निकम उद्योजक तथा समाजसेवक श्री पृथ्वीराज उत्तमराव धर्मे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा माळीवाडा

विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची आवड असणारे नाथरा येतील भागवतराव वाकणकर, सर्वोदय फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक श्री ज्ञानेश्वर मुरलीधर घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती

त्याप्रसंगी या प्रमुख पाहुण्यांनी विज्ञानाचे आपल्या जीवनातील स्थान तसेच विज्ञानाचे महत्त्व मनोगत केले.

अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान देण्याबद्दल सांगितले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विज्ञान प्रदर्शनानिमित्त परीक्षक म्हणून पहिली ते चौथी या गटात तीन पारितोषिके तसेच पाचवी ते सातवी या गटामध्ये तीन परिस्थिती अशी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

म्हणजे विजेते झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रतिष्ठान तर्फे सन्मान चिन्ह देण्यात आले.

तसेच सहभागी विद्यार्थ्यांना देखील सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाथरगव्हाण बुद्रुक शाळेचे मुख्यध्यापक श्री महात्मे सर यांनी अध्यक्ष होते.

यावेळी उपस्थित श्री गाढे सर, घोडके मॅडम, बचाटे सर,जुकटे सर ,लांडगे सर, विकास शिंदे, जितेंद्र चव्हाण, मनोज भाले, संदीप मुंडे, सचिन संघई, सारंग विहितकर शालेय समितीचे अध्येक्ष सर्जेराव घाडगे, अनंत घाडगे, अंगद घांडगे, श्याम जनार्दन घांडगे, विष्णूपंत घाडगे, कोंडीराम घाडगे, दिनेश घांडगे, अरुण घाडगे, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष श्री शिवाजीराव भुमरे, सूत्रसंचालन श्री सारंग सर केले तर आभार प्रदर्शन संस्था अध्येक्ष सुनील घांडगे यांनी केले.

प्रतिनिधी दादाराव ढवळे lok मंच मराठी परभणी.

नांदेड : जबरी चोरीचा गुन्हा उघड; १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई Maharashtra Police अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास नांदेड … Read more

*दर्जा, ट्रेसेबिलिटी आणि मूल्यवर्धनावर भर दिल्यास*

*निर्यात संधी अधिक वाढतील – सचिव एन. भवानीश्री* *शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी* *खरेदीदार-विक्रेता मेळावा प्रभावी व्यासपीठ- जिल्हाधिकारी* *हळद क्षेत्रातील शेतकरी-निर्यातदार संबंध मजबूत करण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा* नांदेड, 9 मार्च : जागतिक हळद व्यापारात भारताचे नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार उत्पादन व ट्रेसेबिलिटीचे महत्त्व अधिक असून “हळद उत्पादनासाठी भारताची जागतिक स्तरावर मजबूत ओळख आहे. दर्जा सुधारणा, ट्रेसेबिलिटी आणि … Read more

नांदेडमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सेतू केंद्र भरतीवर प्रश्नचिन्ह

ग्रामीण भागातील वास्तव, सुशिक्षित बेरोजगारी आणि वाढती आर्थिक असुरक्षा नांदेड : देशात आणि राज्यात दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. उच्च शिक्षण घेऊनही स्थिर रोजगार न मिळाल्याने तरुणाईत असंतोष वाढत चालला आहे. अशा पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध योजनांमधून रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली जाते. “आपले सरकार सेवा केंद्र” ही संकल्पना देखील डिजिटल सेवांद्वारे ग्रामीण व शहरी नागरिकांना … Read more

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

कृषी संलग्न विभागांचा सविस्तर आढावा; कृषी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान नांदेड, दि. २४फेब्रुवारी : जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या केंद्रीय नोडल अधिकारी … Read more

गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा धडाका

नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे मार्फत मोठी कार्यवाही एकाच वेळी पाच ठिकाणी छापे; 2 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड, दि. 23 फेब्रुवारी 2026 – महाराष्ट्र पोलीस अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस यांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपशाविरोधात मोठी आणि समन्वित कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी धाड टाकली. या … Read more

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन; नांदेड येथील सर्व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग

दिनांक : 20/02/2026 लोकमंच मराठी नांदेड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या असहकार आंदोलनास नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार व जबाबदाऱ्यांनुसार स्वतंत्र व सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, पदोन्नतीसाठी स्पष्ट धोरण जाहीर करणे, वाढत्या कामाच्या ताणानुसार मनुष्यबळ वाढविणे तसेच सेवा अटी व सुविधा … Read more

मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजनेला वेग”

अतिक्रमणमुक्त, बारमाही रस्त्यांसाठी शासनाची कडक भूमिका; नुकसान केल्यास फौजदारी कारवाई नांदेड दि.१८ फेब्रुवारी:-ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मजबूत, दर्जेदार व बारमाही शेत/पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंधार येथे विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष आमदार प्रतापराव … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न*

• *शाहिर प्रा. डॉ. शिंदे, प्रा. डॉ. हंबर्डे संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रमाचे दर्जेदार सादरीकरण* • ⁠ • *अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मान्यवरांसह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती* नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात प्रसिद्ध … Read more