मराठीच्या मुद्द्यावरून शासकीय कर्मचारी आणि महिलेमध्ये जुंपली

शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम आहे. पण मुंबईत एका एका वाहतूक पोलिस हवालदाराने यावरुन महिला प्रवाशासोबत हुज्जत घातली. शासकीय कर्मचाऱ्याने मराठीत बोलण्याचा असा कोणताही नियम नसल्याच सांगत वाहतूक पोलिस हवालदाराने महिलेशी हुज्जत घातली. बुधवारी ही घटना घडली. गोरेगाव येथे राहणाऱ्या अनुप्रिया देसाई या बुधवारी दुपारी काही कामानिमित्त आपल्या वाहनाने बाहेर गेल्या होत्या. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांच्या … Read more

ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजार हादरले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेने जगातील अनेक देशांना धक्का दिला आहे. भारतीय शेअर बाजारात जणू भूकंपच झाला आहे. काही मिनिटात लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. अमेरिकेने भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्यात आला … Read more

ऑटो टॅरिफचा भारताला किती फटका पडणार?

अमेरिकेच्या 25 टक्के वाहन शुल्काचा नकारात्मक परिणाम भारतावरही दिसणार आहे. पण या ऑटो टॅरिफचा अमेरिकेला कितपत फायदा होणार आणि भारताचं किती नुकसान होणार, सर्वात मोठा प्रश्न आहे. एका अहवालात ट्रम्प यांच्या एका सहकाऱ्याने दावा केला आहे की, ऑटो टॅरिफ लादून अमेरिकेला दरवर्षी 100 अब्ज डॉलर्स (8.6 लाख कोटी रुपये) फायदा होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड … Read more

छ. संभाजीनगरमध्ये मनसेची पोस्टरबाजी

सध्या संपूर्ण देशात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेला वाद संपायचे नाव घेत नाही. एकीकडे काही लोक कबर हटवण्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, अनेक नेत्यांनी आणि अगदी संघानेही याला वायफळ मुद्दा असे म्हटले आहे. या सगळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवर ‘औरंगजेब इथेच गाडला…’ असे लिहिण्यात आले आहे. या पोस्टरची सध्या … Read more

वक्फ दुरुस्ती विधेयक चर्चेपूर्वी मुस्लिमबहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर

वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. आज दुपारी 12 वाजता एनडीए सरकारतर्फे हे विधेयक मांडण्यात येणार असून त्यावर सुमारे 8 तास चर्चा होणार आहे, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे वक्फ सुधारणा विधेयक मांडणार आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुस्लिमबहुल भागात महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली … Read more

सर्वणकारांच्या मुलावर मनसैनिक भडकले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यात महाकुंभ, नदी प्रदूषण या विषयावर सविस्तरपणे बोलले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते, माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरने दादरमध्ये मनसेला डिवचणारे पोस्टर लावले. त्यावरुन महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले आहेत. “बाल बुद्धी जो बाबू आहे, समाधान सरवणकर तो कोण आहे? हा जो एक … Read more

वक्फ बिलावरुन संजय राऊतांचा सवाल

वक्फ सुधारणा विधेयकावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेत मांडलं जाणार आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करुन उद्धव ठाकरे गटाला सवाल केला. “बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी … Read more

अजित पवार यांचं लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा भाष्य

गेल्या वर्षी जुलै महिन्यात अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ‘ जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात.आतापर्यंत एकूण नऊ हफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा … Read more

कृषिविभागाविरोधात सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील लिंकींग प्रकाराबाबत खळबळजनक आरोप केले. राज्यात तीस अधिकारी आहेत. त्यांच्या 43 कंपन्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या तयार केल्या आहे. त्या कंपन्यांनी निर्माण केलेला माल लिंकींग करून शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. सरकारमध्ये नोकरी करताना नातेवाईकांच्या नावांवर, पत्नीचा नावावर कंपन्या करण्यात आल्या.  कृषी विभागात … Read more

चित्रा वाघ ह्यांचा राऊतांवर घणाघात

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा उल्लेख उबाठाचा पाळलेला पोपट आणि रडत राऊत असा करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ‘संजय राऊत यांनी भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे. स्वयंघोषित विश्व गुरूने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावं … Read more