आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे जमा करणारा विशाळ हा माझाच सहकार म्हणत सुरेश धस यांनी दिली कबुली

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी आशिष विशाळ हे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप दिला होता. हा आशिष विशाळ माझा … Read more

जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत कोणताही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी यंदाची होळी साजरी केली नाही. या वेळी हजारो वर्षांची परंपरा त्यामुळे खंडीत झाली आहे. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडानंतर महाराष्ट्राची वाट आता बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने होऊ … Read more

दिल्ली विरुद्ध मुंबईचा महाअंतिम सामना, रंगणार शनिवारी 

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामातील अंतिम फेरीतील 2 संघ निश्चित झाले आहेत. एका बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या मोसमातील अंतिम सामन्याची तयारी सुरु झालीये. मुंबई इंडियन्स वूमन्सने गुरुवारी 13 मार्चला गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर त्याआधी दिल्ली कॅपिट्ल्सने थेट … Read more

जयंत पाटलांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं, माझं काही खर नाही, माझी ग्यारंटी घेऊ नका असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून चर्चेला उधाण आलं असताना त्यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाथ्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळून … Read more

धुळवडीला मटणाच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा

आज धुळवडीचा सण असल्यामुळे खवय्यांकडून मांसाहारावर ताव मारला जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि नागपूरमध्ये सकाळपासूनच मटणाच्या दुकानांबाहेर रांगा लागलेल्या पहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी चिकन मटण दुकानाच्या बाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत.महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे तरी देखील नागरिक रांगा लावून मटण … Read more

सैराटची पुनरावृत्ती काही थांबेना

राज्यात आणखी एक सैराट घडलाय. मुलीने प्रेम विवाह करताच निर्दयी बाप आणि भावाने गळा दाबून मुलीची हत्या केल्याची घटना घडलीये. मुलीच्या लग्नाची माहिती मिळताच आरोपी भानू राठोड आणि त्याचा मुलगा हिमांशू राठोड यांनी 12 मार्च रोजी सकाळी नेहाला पकडून तिची हत्या करून अंत्यसंस्कार केले. मुलीनं दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेमविवाह केल्यानंतर संतापलेल्या बाप आणि मुलानं अक्षता … Read more

मटणाच्या दुकानांना हिंदुत्वाचे लेबल, राजकारणातला वाद ताटातल्या अन्नपर्यंत पोहोचलाय

राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी हिंदू खाटकांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचं जाहीर केलंय. हे प्रमाणपत्र असलेल्या हिंदू दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. यामुळे वेगळे खटके उडताना दिसत आहेत. नेते मंडळींकडूनही राणेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाज माध्यमावर … Read more

मुंबई-अमरावती एक्सप्रेस अपघात, अपघातामुळे गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

जळगाव जिल्ह्यातील बोदवडजवळ मुंबई- अमरावती एक्सप्रेसला अपघात झालाय. या अपघातामुळे रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय. जळगाव जिल्ह्यातील बोदवडजवळ मुंबई- अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला आहे. या अपघातामुळे रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय. या अपघातामुळे मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक संपूर्णतः कोलमडलंय. या अपघातामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक … Read more

भरधाव कारने पोलिसांना चिरडले

होळी आणि ईद एकत्र असल्याने पोलिसांकडून आज देशभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाकाबंदीसाठी असलेल्या पोलीस कर्मचारी आणि एका व्यक्तीला भरधाव कारने चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. कारचा वेग इतका होता की, तिघेही सुरक्षेसाठी लावलेल्या काटेरी तारांमध्ये अडकले आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे झाले. मृतांमध्ये कॉन्स्टेबल सुखदर्शन, होमगार्ड राजेश आणि एका व्यक्तीचा … Read more

सोन्याचे दर चढेच, गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या किंमतीत एक हजार रूपयांची वाढ झाल्याने सोन्याचे जीएसटीसह (GST) दर 90 हजार 200 वर जाऊन पोहोचल्याचे सुवर्ण नगरी जळगावात पाहायला मिळाले आहे. येणारा काळ हा लग्नसराईचा असतांना सोन्याच्या किंमतीत सातत्यानं चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या किंमतीत एक हजार रूपयांची वाढ … Read more