उमराणी (ता.जत) गावातील नैसर्गिक ओढापात्रात अवैध मार्गाने मुरूम टाकून उभारलेली खोकी काढून ओढापात्र खुले करावे..ओढापात्रात टाकलेल्या मुरूमाचा पंचनामा करुन तहसीलदार प्रवीण धानोरकर व प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांचेवर कारवाई करावी.मागणीसाठी राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार,तालुकाध्यक्ष नवनाथ पवार,यांचे नेतूत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यावेळी महसुल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी श्री.नष्टे यांना दिलेल्या निवेदनात राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हंटले आहे की, उमराणी पाझर तलावालगत असणाऱ्या नैसर्गिक ओढापात्रात बेकायदा उत्खनन केलेला व लाखों रुपयांची रॉयल्टी बुडवून मुरूम टाकण्यात आला आहे. तसेच विनापरवाना सपाटीकरण करून ग्रामपंचायतीने त्यावर दुकाने गाळे उभा करीत ओढापात्रावर अतिक्रमण केले आहे.नैसर्गिक ओढापात्र मुजविण्यासाठी संबधित विभागाची परवानगी घेतलेली नाही.
ओढा पात्रात टाकण्यात आलेल्या मुरुमाची.ई.टी.एस.मोजनीमध्ये 392.235 ब्रास मुरूम टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.तरी उमराणी ग्रामपंचायतीकडून केवळ 60 ब्रास मुरूमाची रॉयल्टी भरून जुजबी कारवाई फार्स केला आहे.तेंव्हा 332.235 ब्रास मुरूमाची बुडालेली रॉयल्टी दंडासह भरुन घ्यावी.कर्तव्यात कसूर करणारे तलाठी प्रवीण घाडगे,मंडळ अधिकारी उत्तम कांबळे,यांची चौकशी करावी.
तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर महसुल नियमांचे उल्लंघन करणे,पदाचा गैरवापर करणे,दफतर दिरंगाई करणे,शासनाचा महसुल बुडविणे,तक्रारधारकाना धमकावणे,प्रकरणी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.त्यांची पदोउन्नती थांबवून सेवेतून निलंबन करावे.
वरिष्ठ अधिकारी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांची विभागीय चौकशी प्रास्तावित करावी.अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.यावेळीं राज्याध्यक्ष प्रशांत केदार,जिल्हाध्यक्ष बंडू केंगार,जत तालुकाध्यक्ष नवनाथ पवार,सिध्दाप्पा खांडेकर,निलेश मांगलेकर, अविनाश पाथरवट,रविराज भूकटे,बसगोंडा तेली,शहाजी वाघमोडे,अतुल ऐवळे,सिद्धू जाधव.लियाकत बारुदवाले,संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : उमराणी (ता.जत) येथील नैसर्गिक ओढापात्रातील अतिक्रमण काढावे.मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करताना राज्याध्यक्ष प्रशांत केदार,तालुकाध्यक्ष नवनाथ पवार,अविनाश पाथरवट,बंडू केंगार,सह पदाधिकारी व कार्यकर्ते





Users Today : 24