भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हापासून संघर्षाला तोंड फुटलंय तेव्हापासून असद्दुदीन ओवैसी हेदेखील रोखठोक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी वेळोवेळी पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आहे. पहलगामवर दहशसतवादी हल्ला झाल्यानंतर ओवैसी यांनी त्या घटनेचा जाहीर निषेधही केला होता. दरम्यान, आता ओवैसी यांनी पाकिस्तानाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. त्यांनी पाकिस्तानची थेट इज्जतच काढली आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये चीनचाही उल्लेख केला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचेही त्यांनी थेट नाव घेतले आहे. “शाहबाज सरीफ आणि असीम मुनीर चीनकडून भाड्याने घेतलेले लढाऊ विमान रहीम यार खान हवाई तळावर उतरवू शकतात का?” असा खोचक सवाल ओवैसी यांनी केला आहे.



