Home » खेल » नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धाही स्थगित

नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धाही स्थगित

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता शिगेला पोहचला आहे. पाकिस्तानला ठेचल्यानंतरही त्यांच्या कुरापती सुरुच आहेत. दुसऱ्या देशांकडून कर्ज मागण्याची वेळ ओढावलेली असतानाही पाकिस्तान धजावत नाहीये. पाकिस्तान भारतावर हल्ले करण्याचे वारंवार प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने नागरी वस्त्यांवर हल्ला केला जात आहे. या साऱ्या स्थितीचा परिणाम हा दोन्ही देशातील क्रीडा वर्तुळावरही झालेला पाहायला मिळत आहे. आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएल 2025 आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. अशात आता भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यालाही भारत-पाकिस्तान तणावाचा फटका बसला आहे.

बंगळुरुत येत्या 24 मे रोजी ‘नीरज चोप्रा क्लासिक’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र युद्धभूमीवर सुरु असलेल्या कारवायांमुळे नाईलाजाने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. नीरज चोप्रासह या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू सहभागी होणार होते. मात्र खेळाडूंच्या सुरक्षितता हे आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांकडून सोशल मीडियावरुन देण्यात आली. तसेच भारतीय सैन्याला आमचा संपूर्ण पाठींबा आहे. लवकरच या स्पर्धेसाठी पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असंही आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?