Home » Today In Focus » पाकिस्तानी पत्रकारांवर भारताची मोठी कारवाई

पाकिस्तानी पत्रकारांवर भारताची मोठी कारवाई

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भारतीय लष्कर आणि सरकारविरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. अशातच पाकिस्तानी पत्रकार आणि काही पीआर एजन्सीविरोधात केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय लष्कर आणि  सरकारविरोधात सातत्याने अपप्रचार करणं पाकिस्तानी पत्रकार आणि काही पीआर एजन्सींना चांगलंच महागात पडलं आहे. कारणं  पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती.

अपप्रचार केल्यानं पाकिस्तानी पत्रकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान ISPR आणि ISI संबंधित पाकिस्तानी पत्रकारांवर ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर संदर्भात खोट्या बातम्या आणि अपप्रचार केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यासोबत आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एक्स अर्थात ट्वीटरवर देखील बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच भारत सरकारने अनेक पाकिस्तानी पत्रकारांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही बंदी घातली आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?