Home » आंतरराष्ट्रीय » सीमा हैदर पाकिस्तानात जायला तयार नाही!

सीमा हैदर पाकिस्तानात जायला तयार नाही!

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच कारणामुळे नेपाळच्या मार्गे भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या तिच्याकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. त्यामुळेच सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानमध्ये जावे लागणार का? असे विचारले जात आहे. त्यानंतर आता खुद्द सीमा हैदरने पाकिस्तानला जाण्याबाबत मोठी आणि महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरला पाकिस्तानला परत पाठवले जाणार का? असे विचारले जात आहे. याच कारणामुळे सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मला पाकिस्तानला पाठवू नका, अशी विनंती ती सातत्याने करत आहे. आता मात्र तिने थेट आत्महत्या करण्याचाच इशारा दिलाय.

विशेष म्हणजे तिने सर्वांकडे माझी मदत करा, अशी याचना केली आहे. “मी सर्वांना विनंती करते की माझी मदत करावी. मला पाकिस्तानमध्ये जायचे नाही. मी मरून जाईल. गाडीतून खाली उडी खाऊन आत्महत्या करेन, पण मी पुन्हा पाकिस्तानमध्ये जाणार नाही,” असं सीमा हैदरनं म्हटलं आहे.

यासह “मला भारत खूप छान वाटतो. इथले लोक खूप छान आहेत. भारताची प्रत्येक गोष्ट खूपच छान आहे. इथलं जेवणही मला आवडतं,” अशी स्तुतीसुमनेही तिने भारताबद्दल उधळली आहेत.

Leave a Comment