Home » राजकारण » संभाजीराजे यांचे वाघ्या कुत्र्यावर स्पष्टीकरण

संभाजीराजे यांचे वाघ्या कुत्र्यावर स्पष्टीकरण

“वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलं आहे. कुठलाही इतिहास नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे. पहिल्यादिवसापासून माझी भूमिका आहे, ते कुत्र हटवलं पाहिजे. तुकोजीराव होळकर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली. कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही. तुकोजी महाराजांच नाव सोनेरी अक्षरात लिहिलं पाहिजे, रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारी घेतली आहे” असं संभाजी महाराज म्हणाले. आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर ते मीडियाशी बोलत होते.

“माझी मुख्यमंत्री महोदयांसोबत या संदर्भात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री महोदयानी मला सांगितलय, मी लवकरच समिती स्थापन करणार आहे. आज मी मुंबईत आलोय, वाघ्या कुत्रा हटवण्यासंदर्भात आज किंवा उद्या वेळ देणारं, सविस्तरपणे चर्चा होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडला येणार, म्हणून मी विषय थांबवलेला. डेडलाईन कुठलीही नाही. दंतकथेतून तयार झालेलं वाघ्या कुत्रं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं चुकीच आहे. म्हणून सरकार माझ्या मागणीची दखल घेईल अशी अपेक्षा आहे” असं संभाजीराजे म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक व्हावे. अरबी समुद्रात स्मारक करू म्हणतात. कुठंही करा, उदयनराजे किंवा उद्धव ठाकरे म्हणतात तसं राजभवनात करा. गडकोट किल्ल्यांचे संवर्धन व्हावे. रायगडाप्रमाणे इतर किल्ल्यांचे जतन व्हावे. आम्ही फोर्ट फेडरेशन काढतोय, 25 किल्ले आम्ही संवर्धित करणार आहोत. महाराजांच्या जिवंत स्मारकाचे अर्थात किल्ल्यांचे जतन संवर्धन आवश्यक आहे” असं संभाजीराजे म्हणाले.

‘आज कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही’

“आज चंद्रशेखर बावनकुळेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. आम्हाला महसूल विभागाकडून 30 एकर जमीन मिळणार आहे, त्यासाठी ही भेट घेतली” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. “बावनकुळे यांचे आभार. असोसिएशनची फाईल मंजूर करावी असं त्यांना म्हटलं. त्यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम होण्यासाठी मदत होणार आहे” असं संभाजी राजे म्हणाले.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?