Home » Today In Focus » वक्फ कायद्याबाबत अपडेट

वक्फ कायद्याबाबत अपडेट

मोठी बातमी समोर येत आहे, नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आली आहे.  केंद्र सरकारला उत्तर देण्यास सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. केंद्र सरकारने जैसे थेच परिस्थिती ठेवावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार आहे. पाच मे रोजी दुपारी दोन वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

या प्रकरणात सत्तरपेक्षा अधिक याचिका दाखल झालेल्या आहेत, यातील महत्त्वाच्या पाच याचिकांवर ही सुनावणी सध्या सुरू आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आली आहे.  केंद्र सरकारला उत्तर देण्यास सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. तोपर्यंत केंद्र सरकारने परिस्थिती जैसे थेच ठेवावी असं सुप्रिम कोर्टानं म्हटलं आहे.

दरम्यान सुप्रिम कोर्टाकडून नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना स्थगिती देण्यात आल्यानंतर आता असुद्दीन ओवैसी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  वक्फ सुधारणा कायदा हा असंदीय आहे. तुम्ही आधी हा कायदा पूर्णपणे समजून घेतला पाहिजे. राज्य वक्फ बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्याला तुम्हाला त्या कायद्याला पूर्णपणे समजण्याची गरज आहे. वक्फ सुधारणा कायदा हा असंदीय आहे. राज्य वक्फ बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्यावर स्थगिती देण्यात आली आहे. आम्ही या कायद्याला न्यायालयात चॅलेंज दिलं आहे. आमचा या कायद्याला विरोध असल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?