Home » Today In Focus » शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवींची नियुक्ती

शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवींची नियुक्ती

आपलं लक्ष्य बीएमसी आहे. त्यासाठीच सुधीर साळवी यांची सचिवपदी नियुक्ती केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. सुधीर साळवी यांची सचिव पदावर नियुक्ती झाल्यावर शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं लक्ष्य आता बीएमसी असल्याचं विधान केलं आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तयारी केली जात आहे. त्याच अनुषंगाने पक्षाच्या काही पद नियुक्त्या ठाकरेंनी केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सुधीर साळवी यांना शिवसेना उबठा गटाचं सचिव पद देण्यात आलेलं आहे.

Leave a Comment