Home » Today In Focus » शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी

सातारा शहरातील पोवई नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याविषयी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माहिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला या बाबतचा तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या व्यापारांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने संतापलेल्या एका व्यापाऱ्याने चक्क पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी दिली. “तुला गोळ्या घालतो” अशा शब्दात त्याने माजोरडेपणाने ही धमकी दिली, त्यामुळे साताऱ्यात मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील रविवार पेठेत असलेल्या पोवई नाका भाजी मंडईमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये बसण्याच्या जागेवरुन नेहमीच वाद होत असतात. भाजी मंडईची डावी बाजू आणि तेथील दोन रांगा शेतकऱ्यांसाठी आरक्षित आहेत. पण गेल्या काही काळापासून या जागेवर दोन छोट्या टपऱ्यांनी अतिक्रमण केलं. याच घटनेची दखल घेत काही शेतकऱ्यांनी थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर शेळके यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिली.व्यापाऱ्यांकडून या लाईन मध्येच अतिक्रमण केले जात असल्यामुळे मंडईमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याबाबत सांगत होते .

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?