Home » Today In Focus » उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर तीव्र टीका

उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर तीव्र टीका

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी अधिवेशन निरर्थक आणि अपयशाचे लपवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हमीभावाचा अभाव आणि सत्ताधाऱ्यांचा माज यावर त्यांनी भाष्य केले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. या अधिवेशनानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी घणाघात केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. हताशा, निराशावादी अर्थसंकल्प होता. ही अस्वस्थता, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. विशेषत: जेव्हा हे सरकार स्थापन झालं, तेव्हा 100 दिवसात आम्ही काय करणार हा संकल्प त्यांनी केला होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरु आहेत. हमीभाव मिळत नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सत्ताधाऱ्यांचा माज दिसला
अधिवेशन काळात देशाला राज्याला चांगलं गाणं मिळालं. हे समाधान मानावे लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असं अधिवेशन आहे. हे जयंत पाटील म्हणाले ते बरोबर आहे. सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. या पूर्वी कधीही गेल्या काही वर्षात विरोधी पक्षाने राज्यपलांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात आणि त्याचा वापर कसा करतात हे सांगितलं. असं कधी घडलं नव्हतं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Comment