Home » गुन्हा » नागपुर दंगली संदर्भात सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या दोघांना अटक

नागपुर दंगली संदर्भात सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या दोघांना अटक

नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअर याला अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आता धडक कारवाई सुरु झाली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या १०५ वर केली आहे. त्यात दहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान या प्रकरणात सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर अन् मोहम्मद सहजाद खान अशी त्यांची नावे आहेत.

नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअर याला अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. सोशल मिडिया मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्याचा त्याचावर आरोप आहेत. ज्या भागात हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर राहतो.

सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणारा मोहम्मद सहजाद खान यालाही अटक करण्यात आली आहे. तो युट्यूबर आहे. तो डिजिटल पोर्टल चालवतो. औरंगजेब कबर विरोधातील आंदोलनाविरोधात त्याने व्हिडिओ व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हे व्हिडिओ लोकांच्या भावना भडकवणारे होते. त्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?