
राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी हिंदू खाटकांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचं जाहीर केलंय. हे प्रमाणपत्र असलेल्या हिंदू दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
यामुळे वेगळे खटके उडताना दिसत आहेत. नेते मंडळींकडूनही राणेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाज माध्यमावर मला हवे तेथुन मी खरेदी करणार अशी पोस्ट केली आहे. दरम्यान, मटणाच्या दुकानांना मल्हार नाव देण्यावरूनही मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
मटणाचं दुकान अन् हिंदुत्वाचं लेबल! हलाल आणि झटका मटण, याची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. राजकारणातला हा वाद आता ताटातल्या अन्नापर्यंत येणे समाजासाठी अत्यंत घातक असल्याचं जाणकारांच म्हणणं आहे. यामुळे हिंदू मुस्लिम वाद उफाळू शकतो आणि समाजात विनाकारण तेढ निर्माण होऊ शकतो. असं ही अनेकांचं म्हणणं आहे.
Aarti Dhabale




Users Today : 22