“गणेशोत्सव, दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणता. पर्यावरणाची इतकी काळजी आहे, मग गढूळ पाण्यात महाकुभंमध्ये का स्नान करायला लावलं?. राष्ट्रीय हरीत लवादाचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली?” असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहेत.
“9 लाख 32 हजार कोटींच महाराष्ट्रावर कर्ज आहे. आता कर्ज काढून राज्य चालवल जातय. राज्य़ लुटल जातय. राज्यावरच कर्जाच ओझ दिवसेंदिवस वाढतय हे माहित असताना सुद्धा लाडक्या बहिणी सारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळी सारख्या गरीबांच्या योजना, शिधा योजना अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहिण योजना सुद्धा बंद करतील” असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. “हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकीत मत विकत घेणं हा म्हणजे कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांची मत विकत घेण्यासाठी वापरली” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“जाहीरनाम्यात त्यांच्या दोन प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्ज माफी या घोषणा आहेत. त्याचं तुम्ही काय करणार याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालं पाहिजे. आठ लाख हजार कोटीच्या वरच कर्ज हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात?” असा सवला संजय राऊत यांनी विचारला. “शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती?. शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले. टेंडर देण्यात आले. ते पैसे निवडणुकीचत वापरले असतील किंवा आमदार खरेदीसाठी वापरले असावेत” असं संजय राऊत म्हणाले.
‘हे कसलं हिंदुत्व ?’
“वरळीत होळीला परवानगी मिळत नाहीय. त्यानंतर उद्या गणेशोत्सव येणार आहे. पीओपीच्या मुर्तींवरती बंदी आणलेली आहे, हे कसलं हिंदुत्व ?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणताय. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगता होता, मग आता काय झालं? असं संजय राऊत म्हणाले.




Users Today : 39