Home » राज्य » मंत्री पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी इतकं जाहीरपणे बोलल्या

मंत्री पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी इतकं जाहीरपणे बोलल्या

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी पक्षातील नेतेच आमने-सामने आले आहेत. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आता आमदार पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी जाहीरपणे बोलल्या आहेत.

“वृत्तपत्रातील एका पत्रकाराने माझी मुलाखत घेतली. त्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्यावर मी त्यांना सांगितलं, मी यावर उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्याने उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही” असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज द्यावी, असं तुम्ही बोललात का? त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. “ते माझ नाव घेऊन जी चर्चा करतायत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली आहे. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहूचू नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की, त्यांना समज द्यावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

विधान सभेला तुम्ही पक्षविरोधी भूमिका घेतली या आरोपावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा . या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे” “त्यांनी असा आरोप करायला नको होता. प्रचार करताना त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे निकाल लागल्यावर असे आरोप करणं, जो व्यक्ती 75 हजार मतांनी निवडून आलाय, काम केलं नाही, तर कसं शक्य होईल याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“लोकसभेला जे माझं लीड होतं, ते अर्ध्यापेक्षा कमी झालं, मग त्यांनी माझं काम केलं नाही असं म्हणायच का?. त्यांनी जाहीरपणे असं बोलण हे पक्ष श्रेष्ठींना, पक्ष शिस्तीला मान्य नाही. निवडून आल्यावर त्याच गुलालात माझ्या विषयी बोलले. विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला तेव्हापासून 12 मार्च म्हणजे आजपर्यंत बोलण्याच टाळलं. पक्षश्रेष्ठींना विनंती केलीये की, त्यांना समज द्यावी हे खरं आहे” अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?