परभणी जिल्हा :
पालम तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, केरवाडी येथे सकाळ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये विद्याथ्यांनी विविध रंगसंगती व कल्पकतेने अप्रतिम चित्रे रेखाटली.विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी अमेरिकेहून आलेल्या पाहण्यांनी थेट परीक्षा केंद्राला भेट दिली. पाहुण्यांमध्ये कॅरोल, सुझेन,जिनी,मेरिडिय, सिंडी आणि करेन यांचा समावेश होता. त्यांनी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे कौतुक केले आणि काही चित्रांचे फोटोही आपल्या सोबत घेऊन गेले. तसेच, काही विद्यार्थ्यांना त्यांनी खास चित्रे काढून पाठवण्याची विनंती केली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पोळ यांच्यासह अजिंक्य कुलकर्णी, सहशिक्षक संदीप गडगिळे,मनमत गडमवाड,सुरेखा चामले, संगीता पोळ, विद्या बडोले, लता सारंग, उर्मिला कुगणे, उषा किरडे यांनी परिश्रम घेतले. तसेच,परीक्षा केंद्राला भेट देणाऱ्यांमध्ये बबन धुळगुंडे, धोंडीराम सारंग, गोपीनाथ शिनगरे, गंगाताई माने,राम लटपटे, विष्णू जाधव, रवी होनमाने, भीमाशंकर जाधव यांचा सहभाग होता. या परीक्षा केंद्राचे प्रमुख म्हणून प्रल्हाद पांचाळ यांनी जबाबदारी सांभाळली. या चित्रकला स्पर्धेमुळे विद्याच्यांना लेन आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली असून, पाहुण्यांच्या उपस्थितीने त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढल.




Users Today : 27