Home » Uncategorized » परभणी :पालम शहरात मघ्यरात्री एटीएम फोडले , चोरट्यानी सतरा ते आठरा लाख रूपये पळवल्याचा अदाज

परभणी :पालम शहरात मघ्यरात्री एटीएम फोडले , चोरट्यानी सतरा ते आठरा लाख रूपये पळवल्याचा अदाज

पालम शहरातील गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेज जवळ असलेल्या एसबीआय चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी दि.2 फेबुरवारीच्या पहाटे तीन वाजन्याच्या सुमारात गॅस कटरच्या साह्याने ए टी एम तोडून आतील रक्कम लंपास केली आहे. या घटनेने पालम शहरात खळबळ माजली आहे.

घटनास्थळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, सपोनी आर.के.मुंढे यांनी पाहणी केली. सदरील एटीएम फोडण्या अगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वारा जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा कलर चा स्प्रे मारल्याचे निदर्शनात आढळून आले.

दरम्यान एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएम मध्ये 25 लाख रुपयांची कॅश भरण्यात आली होती, परंतु चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही, पण अदाजे सतरा लाख ते आठरा लाख रूपये चोरून नेल्याचा अदाज आहे .याचा तपास चालू आहे.
वृत्तलिहीपर्यंत पालम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?